विद्यार्थिनीवर शाळेतल्याच मुलांनी केला सामूहिक बलात्कार, 9 जणांना अटक
उत्तराखंडमधल्या विकासनगर इथं 10 वीतल्या एका विद्यार्थीनीवर शाळेतल्याच मुलांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यातआलीय.
डेहराडून, ता.18 सप्टेंबर :
उत्तराखंडमधल्या विकासनगर इथं 10 वीतल्या एका विद्यार्थिनीवर शाळेतल्याच मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाळेच्या प्राचार्या आणि आरोपी चार विद्यार्थ्यांसह 9 जणांना पोलिसांनी अटक केलीय. विकासनगरमधल्या जीआरडी वर्ल्ड स्कूलमध्ये ही घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती.

14 ऑगस्टला ही घटना घडली. काही 10वी आणि 12वीतल्या चार मुलांनी या मुलीला शाळेतल्याच आवारात एका निर्जन स्थळी नेलं आणि बलात्कार केला. मात्र घाबरलेल्या मुलीने या घटनेची वाच्यता कुणाहीकडे केली नाही. काही दिसांपूर्वी जेव्हा मुलीचं पोट दुखायला लागलं तेव्हा डॉक्टरांकडे गेल्यानंतर खरी घटना पुढं आली.
पीडित मुलगी आणि सर्व आरोपी हे अल्पयीन असल्याने पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतरही शाळा प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आणि सहकार्यही केलं नाही त्यामुळे विविध सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.
शाळेच्या प्रशासनाने फक्त प्रकरण दडपण्याचा प्रयत्नच केला नाही तर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला असा आरोप पोलिसांनी केला आहे. बाल हक्क आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली असून पोलीस आणि प्रशासनाला नोटीस पाठवली आहे. या घटनेनंतर शाळेतल्या अंतर्गत सुरक्षेचाही मुद्दा पुढं आलाय.
शाळेच्या परिसारत सीसीटीव्ही लावणं हे बंधनकारक असताना शाळा प्रशासनाने सुरक्षेचे उपाय का केले नाहीत असा सवालही पोलिसांनी केला आहे. या घटनेतले आरोपी आणि शाळा प्रशासना विरूद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.
YOUTUBE LIVE 3D NEWS
YOUTUBE LIVE 3D NEWS

0 Comments