-->

Ads

कल्याण पश्चिमेत सामूहिक रक्षाबंधन उपक्रमाला जोरदार प्रतिसाद माजी आमदार नरेंद्र पवार यांची संकल्पना



कल्याण दि.1 सप्टेंबर : 

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात राबवल्या जाणाऱ्या सामूहिक रक्षाबंधन उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून साजऱ्या होणाऱ्या या उपक्रमाचे महिला वर्गातून स्वागत होत आहे. 

माजी आमदार नरेंद्र पवार यांची मूळ संकल्पना असणारा हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून साजरा केला जातो. मात्र कोवीडमुळे गेले दोन वर्षे त्यामध्ये खंड पडला होता. मात्र या वर्षीपासून पुन्हा एकदा हा उपक्रम राबवण्यात सुरुवात झाली आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रत्यके वॉर्डामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो. 


रक्षाबंधनाचे औचित्य साधून पहिल्या टप्प्यामध्ये कल्याण पश्चिमेच्या सापार्डे, कोळीवली, घोलप नगर, गौरीपाडा तलाव आणि फ्लॉवर व्हॅली या पाच प्रभागात झालेल्या उपक्रमाला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली. तसेच उपस्थित महिला वर्गाने यावेळी नरेंद्र पवार यांना राखी बांधून भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या 



तर रक्षाबंधन हा सण भावाकडून बहिणीचे रक्षण करण्याचा संदेश देणारा सण. त्यामुळे आपल्या सर्वांची रक्षा करणे, आपल्या सर्वांचे जीवनमान उंचावणे हे भाऊ म्हणून आपण आपले कर्तव्य असल्याचे मत यावेळी नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले. तसेच पवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आर्थिक दुर्बल घटकांसाठी, निराधार महिलांसाठी, त्यांच्या कुटुंबातील मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. ज्यामध्ये नोकरीनिमित्त ज्यांचे पती परदेशी गेले आहेत अशा गृहिणींना दर महिना उत्पन्न मिळवून देणारी विशेष योजना तसेच आर्थिक मागास वर्गातील कुटुंबातील मुलांना चांगल्या शाळेत मोफत शिक्षण उपलब्ध करून देणारी आर टी ई, शिक्षणाचा अधिकार आदी महत्त्वाच्या योजनांची पवार यांनी माहिती दिली. आणि या योजनेचा लाभ घेण्याचे उपस्थित महिलांना आवाहन केले. 


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालिक भोईर, प्रकाश पाटील, संजय कारभारी, कल्पना पिल्ले, संगीता घोलप, अर्जुन म्हात्रे, दया गायकवाड, भगवान म्हात्रे, अर्जुन भोईर, भावना मनराजा, नीता देसले, रेखा तरे, दिपक डोर्लेकर, तेजस केंबारे आदी संयोजकांनी विशेष मेहनत घेतली.


दरम्यान हा सामूहिक रक्षाबंधन उपक्रम कल्याण पश्चिमेतील इतर प्रभागातही राबवला जाणार आहे.

Post a Comment

0 Comments