-->

Ads

काकडदाती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मधुसूदन नगरमध्ये दोन दुचाकी पेटवल्या ; शहर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना !

पुसद : शहराला लागून असलेल्या काकडदाती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मधुसूदन नगरमध्ये रविवारी सकाळी ३:०० ते ३ : १५ वाजल्याच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने दोन दुचाकीचीवर कपडा टाकून जाळल्या . या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये भीती वाढली असून , पोलिसांनी टवाळखोरांचा बंदोबस्त करावा , अशी मागणी समोर आली आहे . 

प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर 3D News पुसद 

याबाबत प्राप्त माहिती अशी की , शहराला लागून असलेल्या काकडदाती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मधुसूदन नगरमध्ये रहिवासी असलेले प्रदीप मारोती नरवाडे यांच्या अंगात नेहमीप्रमाणे मालकीच्या दुचाकी हीरो फॅशन प्रो क्रमांक. एमएच .२ ९ - ए.व्ही .२३६३ किंमत अंदाजे ५ ९ ४३५ रुपये , दुसरीचा की होंडा एक्टिवा क्रमांक -एमएच .२६ - ए.व्ही.९ ६ ९ १ किंमत अंदाजे ४२ हजार रुपये उभ्या करून रात्री झोपीगेले असताना रविवारी सकाळच्या सुमारास अंदाजे ३:०० ते ३ : १५ वाजल्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात माथेफिरूने त्या दुचाकी वर कपडा टाकून पेटवून दिल्या ही घटना कळण्या आधिच दोन्ही दुचाकी आगीच्या भक्षस्थानी पडल्या . त्यामुळे नरवाडे परिवाराचे अंदाजे एक लाख रुपयांच्या जवळपास या घटनेमुळे नुकसान झाले आहे याबाबत शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सदर घटनेचा तपास शहर पोलीस करीत आहेत . अशा घटनाला आळा घालण्यासाठी आता पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे . तसेच रात्रीची गस्त अधिक कडक करून आशा माथेफिरूचा बंदोबस्त करावा , अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे . या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

Post a Comment

0 Comments