-->

Ads

निलेश सांबरे यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघात सात दिवसांची विजय निर्धार यात्रा

विजय निर्धार यात्रेचा आजचा पहिला दिवस ... पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद 

विजय निर्धार यात्रेत चौकसभा व मोठ्या सभांचा समावेश


कल्याण (प्रतिनिधी) : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर चांगलेच आव्हान उभे केले आहे. अशातच निलेश सांबरे यांनी आपल्या प्रचारासाठी सहा दिवसांची विजय निर्धार यात्रा काढण्याचे जाहीर काल केले . त्यानुसार त्यांची ही यात्रा आजपासून सुरु झाली आहे. सांबरे यांची ही विजय निर्धार यात्रा बुधवार दि. ८ मे पासून सुरु होऊन दि. १४ मे रोजी तिचा समारोप होईल, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. 


आज सकाळी भिवंडीमधील गणेशपुरी येथील सदानंद महाराज मंदिर येथे दर्शन घेऊन सकाळी ८ वा. सदर यात्रेस प्रारंभ झाला . मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघातून ही विजय निर्धार यात्रा मार्गक्रमण करणार असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांना जिजाऊ संघटनेचे आतापर्यंतचे कार्य आणि भविष्यातील असलेले नियोजन या मार्फत पोहचविण्यात येणार आहे. 


संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघ फिरून पुनश्च भिवंडी ग्रामीण येथील दिवे येथे विजय निर्धार यात्रेची सांगता होणार आहे. सदर यात्रेत जिजाऊ अध्यक्ष तथा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे मतदार जनतेशी संवाद साधणार आहेत.


 गुरुवारी दि. ९ मे रोजी सकाळी ८ वा. शहापूर विधानसभेतील वाडा येथून, शुक्रवारी दि. १० मे रोजी सकाळी ८ वा. मानेखिंड (शहापूर) येथून, शनिवारी दि. ११ मे रोजी सकाळी ८ वा. पवाळे (मुरबाड) येथून, रविवारी दि. १२ मे रोजी सकाळी ८ वा. दहागाव


 (कल्याण) येथून १३ मे रोजी कल्याण ग्रामीण आणि कल्याण शहर या भागांत दहागावपासुन सुरु होवुन गोवेली , घोटसई, फळेगाव , टिटवाळा , बनेली ,मोहने  यांसह या टप्प्यातील सर्व गावे नंतर कल्याण शहारातील प्रेम ॲटो , शिवाजी महारज चौक यांसारखी काही प्रमुख ठिकाणे घेत फडके मैदान या ठिकाणी थांबेल तर सोमवारी दि. १४  मे रोजी सकाळी ८ वा. कोन-गोवे नाका (भिवंडी) येथून यात्रा सुरु होणार आहे. या विजय निर्धार यात्रेदरम्यान, ठिकठिकाणी चौकसभा व मोठ्या सभा होणार असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे.

आजच्या विजय निर्धार यात्रेच्या पहिल्याच दिवशी जनतेतून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याने कार्यकर्त्यामध्येही प्रचंड उत्साह पाह्यला मिळत आहे. सांबरे यांच्या या विजय निर्धार यात्रेने चांगलीच वातवरण निर्मिती केली असून त्यांच्या प्रतीस्पर्धांच्या तुलनेत त्यांनी प्रचारात घेतली आघाडी ही वरचढ ठरलेली पाह्यला मिळत आहे. 

 निर्धार यात्रेला वज्रेश्वरी मंदिर येथे दर्शन घेऊन विजय यात्रेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला . यावेळी  गणेशपुरी नाजिकच्या एका स्थानिक महिलेने सांबरे यांना ओवाळत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अनेक महिला समर्थक उपस्थित होत्या तसेच मोठ्या संख्येने स्थानिकांचाही सहभाग पाह्यला मिळाला . येथील स्थानिक दुकानदार सांबरे यांना भरभरून शुभेच्छा देत असल्याचे पाह्यला मिळाले .मंदिराच्या आवारातील प्रत्येक दुकानाला भेट देत असताना एका दुकानदार महिलेने डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिले. व्यापाऱ्यांनी हार घालून त्यांचा सत्कार देखील केला. उपस्थित सर्व महिलांचा देवी म्हणून उल्लेख करत एवढी मातांची शक्ती माझ्यासोबत आहे . माझा हुरूप आणखी वाढला असल्याचे सांबरे म्हणाले . तर भिवंडी लोकसभा 

दरम्यान या विजयी यात्रेच्या टप्प्यात येणाऱ्या सर्व गावांना सांबरे येणार म्हणून जत्रेचे स्वरूप आलेले पाह्यला मिळत असून गाव गावांत रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी करून सांबरे यांचे स्वागत करण्यात येत आहे. तर दरवर्षी आपल्याला मोफत वह्या वाटणारे सांबरे साहेब आपल्या गावात प्रत्यक्ष येणार म्हणून बच्चे कंपनी देखील त्यांना पाह्यला आतुरलेली होती.  येथील त्यांना मिळणारा प्रतिसाद हा उल्लेखनीय आहे . तर कार्यकर्त्यांकडून निलेश सांबरे यांना मिळालेल्या शिलाई मशीन चिन्हाचा जीर्दार प्रचार केला जातोय "मतदार राजा जागा हो... शिलाई मशीनचा धागा हो " अश्या घोषणांनी संपूर्ण विजय यात्रेत दिल्या जात आहेत .


 पाचव्या टप्प्यातील एक महत्वाची लढत म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जात आहे. त्यातच सांबरे यांनी आपल्या सामाजिक कामांनी व निवडणूक प्रचाराच्या झंजावाताने वातावरण ढवळून काढले आहे

Post a Comment

0 Comments